शताब्दीची साक्ष
₹600.00 Original price was: ₹600.00.₹500.00Current price is: ₹500.00.
लेखक : राजेश मडावी
मूल्य : ₹ 600
सवलत मूल्य : ₹ 500
प्रकाशक : स्तंभ पब्लिशिंग हाऊस
दिल्ली ही भारताची राजधानी असली तरी; वर्धा-सेवाग्राम ही त्याच्या
स्वातंत्र्यलढ्याची राजधानी व त्या लढ्याचे प्रेरणास्थान आहे. १९३६ ते १९४६ या
काळात महात्मा गांधी वर्धा शहरात (सेवाग्राम) मुक्कामी होते. आचार्य विनोबा भावे
यांचे पवनार येथील परंधाम आश्रम सेवातीर्थच. त्यांना भेटायला पंडित नेहरु, सरदार
पटेलांपासून मौलाना आझाद व सी. राजगोपालाचारींसह सारे राष्ट्रीय नेते या शहरात
मुक्कामाला येत. त्या साऱ्यांच्या पायधुळीने ही भूमी राष्ट्राचे तीर्थक्षेत्र बनली आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे सगळे महत्वाचे निर्णय वर्धा-सेवाग्राम येथेच घेतले गेले.
या भूमीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य या साऱ्यांचा समग्र वेध घेऊन तो
संघटित स्वरूपात समाजाच्या हाती देणे हे सोपे काम नव्हते. त्यासाठी त्या
ऐतिहासिक काळातील वर्धा-सेवाग्राम येथून निघणारी नियतकालिके, वृत्तपत्रे,
हस्तलिखिते, नेत्यांची भाषणे, त्यांची ग्रंथसंपदा, मुलाखती व पत्रकांचा सखोल वेध
घेत त्यांच्या कर्तृत्वाची ओळख ग्रंथरुपाने जनतेच्या हाती देण्याचे महत्कार्य राजेश
मडावी या तरुण पत्रकाराने केले आहे. ‘शताब्दीची साक्ष : वर्धा-सेवाग्रामची
पत्रकारिता’ या ग्रंथाच्या वाचनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या साऱ्या प्रेरणा,
लोकनेते आणि त्यांचा प्रभाव यांची सुस्पष्ट ओळख पटणारी आहे. त्याचबरोबर
त्यांना मिळालेला प्रतिसादही लक्षात येणारा आहे. या ग्रंथाचे वाचन केवळ आपल्या
ज्ञानातच भर घालत नाही; तर आपल्या डोळ्यांसमोर देशाच्या मध्यवर्ती स्थानाचा,
लोकलढ्याचा व तेथील कृतिशीलतेचा जिवंत पट उभा करतो.
स्वातंत्र्यचळवळीच्या काळातील सामाजिक, राजकीय व वैचारिक प्रवाहांचे दर्शन
घडवणारा हा ग्रंथ अभ्यासक, विद्यार्थी, पत्रकार व वाचकांसाठी मौलिक दस्तावेज
आहे.
– सुरेश द्वादशीवार
This Book is coming Soon, You can Order this book on discount.

Vilas Nanaji Madavi –
Very good book “shatabdhichi saksh”