शताब्दीची साक्ष
शताब्दीची साक्ष Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.
Back to products
भोवरा,खुरपं आणि माऊस
भोवरा,खुरपं आणि माऊस Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

पुढे कसे होईल

Original price was: ₹200.00.Current price is: ₹160.00.

कवी: शंकर लोडे

मूल्य : 200 रुपये

पाने : 96

प्रकाशक : स्तंभ पब्लिकेशन हाऊस

0 People watching this product now!
Description

कवी शंकर खुशालराव लोडे यांचा ‘पुढे कसे होईल?’ हा कवितासंग्रह शेती-माती, नाती आणि मानवी संवेदनांचा आशावाद पेरणारा अर्थपूर्ण काव्यप्रवास आहे. बँक अधिकारी, प्रगतशील शेतकरी ते नाट्य-सिने अभिनेता असा विविधांगी प्रवास करताना कवीने समाजातील विसंगती, अन्याय आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेचे बारकाईने निरीक्षण केले आहे. त्या अनुभवांना त्यांनी संवेदनशील आणि प्रांजळ शब्दरूप देत हा
संग्रह साकारला आहे. या कवितांमध्ये शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील वेदना, संघर्ष आणि आशा यांचे वास्तवदर्शी चित्रण प्रभावीपणे उभे राहते. बालपणापासून म्हातारपणापर्यंतच्या जीवनप्रवासातील अनुभव, संस्कृतीची जपणूक आणि नात्यांतील भावनिकता यांचा समतोल साधणारी ही कविता संवेदनशील मनाला भिडणारी आहे. विकासाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रवाहामागील अंधार दाखवत
असतानाच, सकारात्मकतेचा दीपही कवी कायम प्रज्वलित ठेवतो. तरुण पिढीने सामाजिक व कौटुंबिक जबाबदा्या ओळखाव्यात, हा संदेश या कवितांतून ठळकपणे उमटतो. ‘पुढे कसे होईल?’ हा प्रश्न आज केवळ कवीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मानवजातीचा आणि सजीव सृष्टीचाही प्रश्न बनला आहे. त्यामुळे हा संग्रह विचारप्रवर्तक, आत्मचिंतनाला प्रवृत्त करणारा आणि वास्तवाशी प्रामाणिक राहणारा ठरतो. लय, ताल आणि सुरांची जाण असलेली ही कविता ग्रामीण जीवनाच्या जाणीवांना संवेदनशील स्पर्श करणारी आणि कवी हा शब्दांशी इमान राखणारा माणूस असल्याची साक्ष देणारी आहे.

Reviews

There are no reviews yet

Be the first to review “पुढे कसे होईल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Overall rating*
0/5
* Rating is required
पुस्तकातील विचारांबद्दल आपले काय मत आहे ?*
0/5
* Rating is required