उजेड वास्तवाचे क्रांतीसंग्राम
₹201.00 Original price was: ₹201.00.₹200.00Current price is: ₹200.00.
लेखक – महेंद्रकुमार मेश्राम
मूल्य : 200 रुपये
पाने : 72
प्रकाशक : स्तंभ पब्लिशिंग हाऊस
भंडारा जिल्ह्यातील सकरला (आंधळगाव) येथे जन्म. एम.एस.डब्ल्यू., एम.ए. (समाजशास्त्र), नेट / जेआरएफ (युजीसी), पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण. ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय, नागपूर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत. संविधान फाऊंडेशन, नागपूरचे संयोजक. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, महाराष्ट्र सोशल वर्क एज्युकेटर्स मॅनेजमेंट अँड स्टाफ फोरम, बहुजन हिताय संघ, नागपूरचे आजीव सदस्य. स्वयंसहायता पथ (२०००) या माहिती पुस्तिकेचे लेखन, तसेच कारभारणी (२००६) स्वयंसहाय्यता चळवळीतील महिलांच्या यशोगाथा, उद्ध्वस्त माणसाच्या कविता (२०१५) कवितासंग्रह, अस्वस्थ वर्तमान (२०१९) लेखसंग्रह, लॉकडाऊन (२०२०) कवितासंग्रह, स्वयंसहाय्यता चळवळीतील महिलांची वाटचाल (२०२१) संशोधन ग्रंथ आदी पुस्तके प्रकाशित. A Developmental Progression of Scheduled Caste and Scheduled Tribe in India at the Threshold of Globalization (2015) -National Seminar Proceedings, भारतीय संविधान साहित्य संमेलन (२०१९) या स्मरणिकेचे संपादनकार्य. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनांतर्गत लाभान्वित स्वयंसहायता गटातील महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण (विशेष संदर्भ – गडचिरोली जिल्हा) या संशोधन विषयावर आचार्य पदवी प्राप्त. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोधपत्रिकांमधून २५ हून अधिक संशोधन लेख प्रसिद्ध. समाज प्रबोधन संस्था, नाशिकचा कवी कैलाश पगारे काव्य स्मृती पुरस्कार (२०१५), ३रे रसिकराज साहित्य संमेलन समितीचा गौराबाई हिरामणजी भोयर स्मृती पुरस्कार (२०१६), संविधान सन्मान परिषद, एरंडोल, जळगावचा राज्यस्तरीय संविधान मूल्ये जनजागृती पुरस्कार (२०२५), डॉ. राममनोहर लोहिया वाचनालयाचा ‘बाबांचे शिलेदार’ पुरस्कार (२०२५) आदी पुरस्कारांनी सन्मानित.

Reviews
There are no reviews yet