आमचे लेखक
भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६), ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाते ते एक भारतीय कायदेतज्ज्ञ , अर्थशास्त्रज्ञ , राजकारणी , लेखक आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य ( दलित ) विरुद्ध सामाजिक भेदभावाविरुद्ध मोहीम राबवली आणि महिला आणि कामगारांच्या हक्कांनाही पाठिंबा दिला . ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते, भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते
१९५६ मध्ये, दीक्षाभूमीत , त्यांनी ६,००,००० समर्थकांसह दलितांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू केले . त्यांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. आंबेडकरांना नवयान बौद्धांमध्ये बोधिसत्व आणि मैत्रेय म्हणून ओळखले जाते .
१९९० मध्ये, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न , आंबेडकरांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. आंबेडकरांच्या वारशात लोकप्रिय संस्कृतीतील असंख्य स्मारके आणि चित्रणांचा समावेश आहे. सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आंबेडकरांच्या वारशाचा आधुनिक भारतावर खोलवर परिणाम झाला.
जन्म : ९ डिसेंबर १९७८
Email : kishorkawathe2@gmail.com
डॉ. किशोर कवठे हे आदिवासी आश्रमशाळेत माध्यमिक अध्यापक असून कवी, स्तंभलेखक, लघुकथा लेखक आणि सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आयोजित पहिले युवा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले. पसरत गेलेली शाई, गावसूक्त, दगान, विराणी हे त्यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह. ऐसा चेतला अभंग हा संपादित ग्रंथ. दिशा अंधारल्या जरी हा ललितलेख संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. ‘झाडीबोली साहित्यिक ना.गो. थुटे यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त. राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलनाचे संयोजक. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान, सप्तरंग व नाते आपुलकीचे या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
Email: narendrasonarkar75@ gmail. com
शालेय जीवना पासूनच कविता लेखन. १९९४ पासून पत्रकारिता. दै.चंद्रधून, महासागर, महाभारत वृतपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम. दै.लोकमत, जनवाद, नवराष्ट्र, लोकशाही वार्ता, सामना, महाविदर्भ, प्रिंट मेल, साप्ताहिक आंबेडकरवाद आदी दैनिके व साप्ताहिकात कविता, लेख प्रकाशित. विविध साहित्यिक, सांस्कृतिक व परिवर्तनवादी चळवळींच्या कार्यक्रमाचे निवेदन. पुरोगामी साहित्य संसदचे संस्थापक. त्याद्वारे राज्यस्तरिय पहिले पुरोगामी साहित्य संमेलनाचे आयोजन. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणा-या आंदोलनात, मोर्चात सक्रिय सहभाग. साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. 'वन वे' हा कवितासंग्रह व 'फेस बुक' ही कादंबरी प्रकाशनाधिन.
मूळचे इल्लूर (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) येथील रहिवासी असलेले राजेश तुळशिराम मडावी हे गेल्या दोन दशकांपासून मुख्य प्रवाहातील पत्रकारितेत सक्रिय आहेत. एम.ए. (मराठी), बी.एड. आणि एम.एस.डब्ल्यू. (समुदाय विकास) असे शिक्षण पूर्ण केलेले मडावी सध्या चंद्रपूर येथे वास्तव्यास आहेत.
राजेश मडावी यांच्या लेखणीतून आजवर विविध दैनिके, साप्ताहिके आणि मासिकांमध्ये ४५७ पेक्षा जास्त अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्रख्यात कवी भुजंग मेश्राम यांच्या गोंडी बोलीतील काव्यसंग्रहाचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद २०१८ मध्ये लोकवाङ्मय गृह, मुंबईतर्फे प्रकाशित झाला आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील बोली भाषा अभ्यास प्रकल्पातर्गत त्यांनी प्रेमानंद गज्वी व डॉ. महेश केळुस्कर यांच्या मार्गदर्शनात गोंडी भाषेवर महत्त्वपूर्ण संशोधनपर लेखन केले आहे.
'मीडिया वाच' सारख्या प्रतिष्ठित अंकासाठी 'दंडकारण्यातील बंगाली' या विषयावर त्यांनी विशेष रिपोर्ताज लिहिला. ‘शरद पवार आणि महाराष्ट्र’ यासारख्या महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पातही त्यांचा लेखक म्हणून सहभाग राहिला आहे. राजुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील चौथ्या 'उलगुलानवेध' चिंतन बैठकीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 'आदिवासींचे अस्तित्व व अस्मितेचे भविष्य' या विषयावर अ. भा. नारायणसिंह उईके संघर्ष समितीद्वारे त्यांची अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका २०२४ मध्ये प्रकाशित झाली आहे.
Email : shankarlode7920@gmail.com
शंकर लोडे हे कवी, नाट्यकलावंत, कलारसिक म्हणून परिचित आहेत. त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १९९१ साली लिपीक म्हणून सेवेला प्रारंभ केला. तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते बँकिंग ऑफिसर ग्रेड-१ या पदावरून मुख्यालयातून सेवानिवृत्त झाले. लहानपणापासूनच त्यांना लिखाण, भजन-गायन आणि अभिनय यांची विशेष आवड आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून घर देता का घर, अंधाधुंद, एक रात्र पावसाळी आणि तांडा या नाटकांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. अंधाधुंद या नाटकातील अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्तम अभिनय पुरस्कार प्राप्त झाला आहे. चित्रपट आणि लघुपट क्षेत्रातही त्यांनी आपली छाप उमटवली आहे. हद्द-२ या चित्रपटात त्यांनी राजकीय नेत्याची भूमिका साकारली असून सोन्या, किस्सा टिकट का आणि आखिरी स्टेटस या लघुपटांमध्येही काम केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला क्षेत्रात ते सक्रिय असून आपल्या बहुआयामी कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
sadanandborkar68@gmail.com
सदानंद बोरकर हे लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक, चित्रकार व अभिनेते आहेत. ते श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय नवरगाव, जि.चंद्रपूर येथे प्राचार्य राहिले आहेत. १४० वर्षाहून अधिक वय असलेल्या झाडीपट्टीतील ऐतिहासिक श्री व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगावचे ते सन २००० पासून संचालक व दिग्दर्शक आहेत. १९७८ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले व आजतागायत दोन हजाराहून अधिक नाट्यप्रयोगात यशस्वी भूमिका साकारल्या आहेत. माझं कुंकू मीच पुसलं!, आत्महत्या, हा खेळ सावल्यांचा, नवरे झाले बावरे, हाच जावई पाहिजे, कारस्थान, असा नवरा नको गं बाई!, गंगा जमुना आणि बाप रे बाप ही त्यांनी लिहिलेली व रंगमंचावर रसिकप्रिय ठरलेली प्रसिद्ध नाटके. 'आत्महत्या' या त्यांच्या नाटकाची २००८ मध्ये सार्क इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवलसाठी निवड. आत्महत्या व माझं कुंकू मीच पुसलं! या नाटकांचा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या एम.ए. मराठी, प्रथम वर्ष अभ्यासक्रमात समावेश. झाडीपट्टी साहित्य व संस्कृती संमेलनाचे ते प्रथम संमेलनाध्यक्ष, गोंडवाना विद्यापीठाच्या झाडीबोली साहित्य दालनचे सदस्य, तसेच महाराष्ट्र राज्य नाट्यपरिनिरीक्षण मंडळाचे ते विद्यमान सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा नागपूरतर्फे सर्वोत्कृष्ठ लेखक पुरस्कार व अनेक सन्मानाचे ते मानकरी आहेत.
भंडारा जिल्ह्यातील सकरला (आंधळगाव) येथे जन्म. एम.एस.डब्ल्यू., एम.ए. (समाजशास्त्र), नेट / जेआरएफ (युजीसी), पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण. ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय, नागपूर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत. संविधान फाऊंडेशन, नागपूरचे संयोजक. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, महाराष्ट्र सोशल वर्क एज्युकेटर्स मॅनेजमेंट अँड स्टाफ फोरम, बहुजन हिताय संघ, नागपूरचे आजीव सदस्य. स्वयंसहायता पथ (२०००) या माहिती पुस्तिकेचे लेखन, तसेच कारभारणी (२००६) स्वयंसहाय्यता चळवळीतील महिलांच्या यशोगाथा, उद्ध्वस्त माणसाच्या कविता (२०१५) कवितासंग्रह, अस्वस्थ वर्तमान (२०१९) लेखसंग्रह, लॉकडाऊन (२०२०) कवितासंग्रह, स्वयंसहाय्यता चळवळीतील महिलांची वाटचाल (२०२१) संशोधन ग्रंथ आदी पुस्तके प्रकाशित. A Developmental Progression of Scheduled Caste and Scheduled Tribe in India at the Threshold of Globalization (2015) -National Seminar Proceedings, भारतीय संविधान साहित्य संमेलन (२०१९) या स्मरणिकेचे संपादनकार्य. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनांतर्गत लाभान्वित स्वयंसहायता गटातील महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण (विशेष संदर्भ - गडचिरोली जिल्हा) या संशोधन विषयावर आचार्य पदवी प्राप्त. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोधपत्रिकांमधून २५ हून अधिक संशोधन लेख प्रसिद्ध. समाज प्रबोधन संस्था, नाशिकचा कवी कैलाश पगारे काव्य स्मृती पुरस्कार (२०१५), ३रे रसिकराज साहित्य संमेलन समितीचा गौराबाई हिरामणजी भोयर स्मृती पुरस्कार (२०१६), संविधान सन्मान परिषद, एरंडोल, जळगावचा राज्यस्तरीय संविधान मूल्ये जनजागृती पुरस्कार (२०२५), डॉ. राममनोहर लोहिया वाचनालयाचा ‘बाबांचे शिलेदार’ पुरस्कार (२०२५) आदी पुरस्कारांनी सन्मानित.