दोन घराचं गाव
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
लेखक – सदानंद बोरकर
मूल्य : 250 रुपये
पाने : 104
प्रकाशक : स्तंभ पब्लिशिंग हाऊस
सदानंद बोरकर हे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अशा भूमिकेतून झाडीपट्टीच्या नव्या उमेदीच्या नव्या पर्वाचे नायक आहेत. परिसरातील लोक जीवनाला रंगमंचावर स्थान देऊन वर्तमानातील समस्या, सुख-दुःख, वेदना आणि विद्रोह लोकांपुढे नाटकांतून मांडले आहेत. त्यांचे ‘दोन घराचं गाव’ हे झाडीबोलीतील संवाद असलेले वर्तमान काळातील राजकीय व सामाजिक समस्यांना अधोरेखित करणारे धाडसी नाटक आहे. या नाटकात दोन ग्रामीण कुटुंबाची शोकात्म कहाणी आहे. मानवाने विकासाच्या नावावर निसर्गावर चालवलेली कुऱ्हाड आणि त्यातून उद्भवलेली मानवी मूल्यांची होळी हे या नाटकामागील व्यापक वास्तव आहे. ज्यांच्या कितीतरी पिढ्या ज्या डोंगर-नदीच्या कुशीत विसावल्या होत्या, त्यांना अचानक दूर नेऊन फेकले जाऊ लागले, या विकासाने त्यांना काय दिले? तर फक्त विस्थापन आणि लालफीतशाहीमध्ये अडकलेल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेले दुर्दैव. या दुर्दैवाचे दशावतार ‘दोन घराचं गाव’ या नाटकात पाहायला मिळतात. नाट्यकला ही चित्र, संगीत, अभिनय आणि लोककलांची शक्तीकृत अभिव्यक्ती असते. कलेची अभिव्यक्ती ज्या प्रदेशात होते, त्या प्रदेशातील भाषा, संस्कृती आणि लोककलाच त्या अभिव्यक्तीला समृद्ध करू शकतात हा अत्यंत मौलिक विचार बोरकर यांनी झाडीपट्टीत रुजवला. नाटकाच्या मागील वास्तव गंभीर असले तरी त्यांनी नाट्यवस्तू फार बहारदार शैलीत उभी केली आहे. झाडीबोलीचा संपूर्ण वापर हे नाटकाचे वैशिष्ट्य आहे. तिच्यातील हेल आणि लहेजा नेमकेपणाने पकडणारे पात्र आणि संवाद नाटककाराने रचले आहे. प्रसंग आणि व्यक्तिरेखा या संदर्भात एक प्रभावी रसायन निर्माण करण्यात नाटककार सदानंद बोरकर यशस्वी झाले आहेत.
– प्रमोद मुनघाटे

Dr Laxmikant Kapgate –
झाडीबोली भाषेत, आणि झाडीपट्टीच्या मातीत रुजलेलं हे रसायन साहित्यरूपात उपलब्ध करून देण्यासाठी आपले मनस्वी अभिनंदन 💐💐💐✔️