भेदोडा
गांव हा देशाचा नकाशा, गावाहुनी देशाची परीक्षागावाची भंगता अवदसा, येईल देशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या अभंगातून प्रवचनात गावाची महती लोकांना सांगत. पूर्वी देशातील खेडी स्वयंपूर्ण होती. अठरापगड जातीतील लोक वास्तव्य करीत असलेल्या खेड्यात 12 बलुतेदार होते. प्रत्येकाच्या गरजा गावातच भागविल्या जात असत. देशातील खरी संस्कृती ही खेड्यातच जपली जात होती. दिवसभर काबाडकष्ट करून मनोरंजनासाठी रात्रौला भारुड, किर्तन, कथा, दंडार असायचं एकंदरीत पूर्वी गावातील जीवन फारच आनंदित असायचं याला काही अपवाद सुद्धा असायचे शिक्षणाच्या समस्या आरोग्य जातिभेद जास्त प्रमाणात असायचं हे सर्व आपल्या भेदोडा गावात सुद्धा पूर्वी होतं स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या भेदोडा गावाचा पंचक्रोशीत एक नावलौकिक होता. याला कारण तसे होते. इंग्लंड मध्ये...
