बातमी

आदिम वेदनेचा समकालीन कवितेतील स्वर-डॉ. राजेंद्र मुंढे

कवी अविनाश पोईनकर यांचा ‘दंडकारुण्य’ हा कवितासंग्रह म्हणजे आदिवासी जीवनाच्या
विस्थापनाच्या, अस्मितेच्या आणि संघर्षाच्या विविध पैलूंना कवितेतून भिडवणारा दस्तऐवज आहे.
ही कविता केवळ प्रखर राजकीय विधान किंवा भावना-आवेशाच्या उबळीतून साकारलेली नाही.
ती प्रत्यक्ष अनुभवांच्या खाचखळग्यांतून जन्मलेली आणि जगण्यातूनच उमटलेली आहे. मध्य
भारतातील दंडकारण्य या प्रदेशात कवीने सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून केलेले वास्तवाचे
निरीक्षण आणि त्या निरीक्षणातून निर्माण झालेला संवेदनशील काव्यप्रपंच म्हणजे हा संग्रह आहे.

Leave a Reply