
उमेश पारखी
उमेश पारखी यांचं मुख्यतः कामगार आणि सत्यशोधक चळवळीशी जवळचं नातं असून ते सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. कारखान्यात एक सामान्य कामगार म्हणून कार्याची सुरुवात त्यांनी केली, कामगारांच्या न्याय हक्क मागण्यासाठी संघर्ष करत एक कामगार म्हणून काम करत असताना विस्फोटक तयार करण्याचे तंत्र आत्मसात केले,त्याच कारखान्यात मोठ्या पदावर एका सामान्य कामगारांपासून सुरुवात करत मॅनेजर पदापर्यंत प्रवास केलेला आहे. हे सगळं करत असताना त्यांनी आपली आय टी क्षेत्रातही पकड निर्माण केली, त्यांनी आजपर्यंत अत्यल्प दरात आपल्या लोकांसाठी वेबसाईट करून दिलेल्या आहेत .ते विविध संस्थांशी जुळलेले असून नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून समाजातील अनाथ,गरीब,वृद्ध इत्यादी वंचित घटकांना माणुसकीच्या दृष्टीने त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी मदत व्हावी आणि समाजातील परिस्थितीने दुर्बल असणाऱ्या विध्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी या उदात्त हेतूने कार्य सुरू आहे.संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अंदाजे दहा लाखांची मदत केलेली आहे. आजपर्यंत २ ३ वेळा रक्तदान करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे तसेच २ ९ जुलै २ ० २ ४ ला मृत्युपरांत अवयवदानाचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ते लेखक,कवी असून त्यांचा "शून्यात शोधतो मी" हा काव्यसंग्रह २ ० १ ८ साली प्रकाशित झालेला आहे.त्यांना आजपर्यंत अनेक सामाजिक पुरस्कार प्राप्त झालेले असून अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अक्षर नवांकुर पुरस्कार, मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंग परिषद गुणवंत गौरव पुरस्कार, सप्तरंग प्रकाशन,राजुरा तर्फे विशेष सन्मानपत्र, फिनिक्स साहित्य मंचचा प्रतिष्ठित राज्यस्तरीय फिनिक्स सेवावृत्ती पुरस्कार, धनोजे कुणबी समाज वणी सामाजिक गौरव सन्मानचिन्ह, धनोजे कुणबी समाज चंद्रपूर सामाजिक कार्य सन्मानचिन्ह, विचारज्योत फाऊंडेशन परीक्षण सन्मानचिन्ह, धनोजे कुणबी समाज वरोरा सामाजिक कार्य सन्मानचिन्ह, धनोजे कुणबी समाज भद्रावती सामाजिक कार्य सन्मानचिन्ह एवढेच नव्हे तर त्यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांची सासुरवाडी स्मार्ट ग्राम पंचायत कळमना यांनी त्यांचा नागरी सत्कार केलेला आहे .
