डॉ. उज्वला विजय झाडे

मुळच्या चंद्रपूर येथील असलेल्या डॉ. उज्वला विजय झाडे या सध्या चंदीगड येथील एका महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एम.एस.सी., एम.सी.ए., यूजीसी नेट आणि पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणासोबतच त्यांना बाचन, लेखन, नृत्य व गायनाची आवड आहे. त्यांचा 'इथेरियल रेव्हरी' हा इंग्रजी कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. पंजाब राज्यात त्यांनी विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्य केले आहे. त्यामध्ये रेड क्रॉस सोसायटी, सरदूलगढ, जिल्हा मानसा (२००४-०६), जिल्हा बाल कल्याण परिषद, जिल्हा रेड क्रॉस सोसायटी, भारतीय ग्रामीण महिला संघ, जिल्हा फरीदकोट (२००९-१०) तसेच जिल्हा रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा मोगा (२०१०-११) यांचा समावेश आहे. या संस्थात्मक कार्याच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिकदृष्ट्या वंचित आणि गरजू मुलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला. पाळणाघरे, अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्रे, रात्रशाळा आणि करमणूक उद्याने यांसारख्या प्रकल्पांना त्यांनी गती दिली. तसेच रक्तदान शिबिरे, मानसिक रुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी जनजागृती मोहिमा यांसारख्या आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजनही त्यांनी केले. मूकबधिर तसेच दृष्टिहीन मुलांसह विशेष गरजा असलेल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांनी जागृती व संवेदनशीलता कार्यक्रम राबवले. त्या २०१९ ते २०२२ या कालावधीत चंदीगड येथील बाटिका स्पेशल स्कूलमध्ये सचिव म्हणून कार्यरत होत्या. ही संस्था विशेषतः श्रवण व वाचादोष असलेल्या मुलांच्या कल्याणासाठी सेवाभावी व लोकहितकारी कार्य करते. 'संवेदना' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून लिंगन्याय, सामाजिक समावेशन आणि समुदाय सशक्तीकरण या क्षेत्रातही त्या कार्यरत आहेत.

प्रकाशित साहित्य

कळत नकळत

Purchase Link