शुभम वडस्कर
शुभम नामदेव वडस्कर हे स्तंभ पब्लिशिंग हाऊसमध्ये कार्यरत असून त्यांनी समाजकार्याची पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. सध्या ते पत्रकारितेचे शिक्षण घेत आहेत. अक्षरजुळवणीच्या कामातून पुस्तक, साहित्य आणि विचारविश्वाशी त्यांचा जवळचा संबंध आला. कविता, वाचन आणि लेखनाची आवड असलेल्या शुभम यांच्या जाणिवांना ग्रामीण जीवन आणि सामाजिक वास्तवाची पार्श्वभूमी आहे.
महाराष्ट्राभर केलेल्या सायकल प्रवासातून त्यांनी माणसं, समाज आणि जगण्याचे विविध पैलू जवळून अनुभवले. जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘आनंदाचा तास’ घेण्यासोबतच ते ‘वाचन कट्टा’ या चंद्रपुरातील वाचन चळवळीचे संयोजन करतात. साहित्याची जाण आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालत ग्रामीण शिक्षण व विकासाच्या क्षेत्रात काम करण्याची त्यांची वाटचाल सुरू आहे.