राजेश मडावी

मूळचे इल्लूर (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) येथील रहिवासी असलेले राजेश तुळशिराम मडावी हे गेल्या दोन दशकांपासून मुख्य प्रवाहातील पत्रकारितेत सक्रिय आहेत. एम.ए. (मराठी), बी.एड. आणि एम.एस.डब्ल्यू. (समुदाय विकास) असे शिक्षण पूर्ण केलेले मडावी सध्या चंद्रपूर येथे वास्तव्यास आहेत. राजेश मडावी यांच्या लेखणीतून आजवर विविध दैनिके, साप्ताहिके आणि मासिकांमध्ये ४५७ पेक्षा जास्त अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्रख्यात कवी भुजंग मेश्राम यांच्या गोंडी बोलीतील काव्यसंग्रहाचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद २०१८ मध्ये लोकवाङ्मय गृह, मुंबईतर्फे प्रकाशित झाला आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील बोली भाषा अभ्यास प्रकल्पातर्गत त्यांनी प्रेमानंद गज्वी व डॉ. महेश केळुस्कर यांच्या मार्गदर्शनात गोंडी भाषेवर महत्त्वपूर्ण संशोधनपर लेखन केले आहे. 'मीडिया वाच' सारख्या प्रतिष्ठित अंकासाठी 'दंडकारण्यातील बंगाली' या विषयावर त्यांनी विशेष रिपोर्ताज लिहिला. ‘शरद पवार आणि महाराष्ट्र’ यासारख्या महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पातही त्यांचा लेखक म्हणून सहभाग राहिला आहे. राजुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील चौथ्या 'उलगुलानवेध' चिंतन बैठकीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 'आदिवासींचे अस्तित्व व अस्मितेचे भविष्य' या विषयावर अ. भा. नारायणसिंह उईके संघर्ष समितीद्वारे त्यांची अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका २०२४ मध्ये प्रकाशित झाली आहे.

प्रकाशित साहित्य

शताब्दीची साक्ष

Purchase Link